Ajit Pawar । कोणत्या आमदारांना मिळणार घर, आणि तो कसे, उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

पुणे : आमदारांना मोफत घरांची चर्चा जोरदार सुरु असून, त्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका केली जात आहे. तर दुसरीकडे माध्यमांत आणि सोशल मीडियावरही (Social media) टिकेला सामोरे जावे लागत आहे.  त्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केलं आहे.  (MLAs will not get free house – Ajit Pawar)

 

 

IPL season । आयपीएलचा थरार आजपासून रंगणार

 

अजिर पवार पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक (Pune Rural Superintendent) कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकराने आमदारांचा निधी ५ कोटी रुपये केला (MLAs funded Rs 5 crore) आहे. तो त्यांना घरी नेण्यासाठी दिलेला नाही. आमदारांच्या मतदारसंघात कराव्या लागणाऱ्या कामासाठी दिलेला आहे. मात्र, त्यावरुनही काहीजण टिका करत सुटले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आमदारांना घर देण्याची घोषणा केली. त्यानंतर माध्यमांतून जोरदार  चर्चा सुरू झाली. मात्र, मुंबईत लोकप्रतिनिधींना घर फुकटात मिळणार नाही. जनतेच्या कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या गरीब आणि गरजू लोक प्रतिनिधींना हे घर मिळणार आहेत. ज्यांच्या नावावर घर आहेत. त्यांनाही मिळणार नाही, पवार यांनी असे स्पष्ट केले. (MLAs will not get free house – Ajit Pawar)

 

डायल ११२ अंतर्गत पोलिसांना वाहने उपलब्ध करून दिली आहेत. गुढीपाडवा निमित्त मुख्यमंत्री यांच्या उपस्थित असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे. पोलीस दलाच्या गाड्या सुस्थित नाहीत, असे लक्षात आल्यानंतर नवी वाहने खरेदी सुरू केली. पुण्यात यासाठी १२ कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीकडून दिले आहेत. इलेक्ट्रिक वेहिकॅल कंपन्या प्राधान्य देत आहेत. वर्षभरात राज्यात पाच हजार चार्जिंग स्टेशन  उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे यापुढे सरकारी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहने घेण्याचा विचार सुरू आहे, असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. (MLAs will not get free house – Ajit Pawar)

Local ad 1