पुणे कॅन्टोन्मेंंटमध्ये आमदार सुनील कांबळे मतदारांशी साधतायेत संवाद

 

पुणे : पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात (Pune Cantonment Assembly Constituency) विद्यमान आमदार सुनील कांबळे (MLA Sunil Kamble) यांची आरोग्यदूत अशी ओळख आहे. ते सध्या पदयात्रेच्या माध्यमातून मतदारसंघात नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या या पदयात्रांना युवक, युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार कांबळे यांच्या पदयात्रेची सुरुवात प्रभाग 20 मधील पंचशील चौक ताडीवाला रोड इथून गणपती बाप्पांची आरती करून सुरुवात झाली. तर लडकत वाडी या ठिकाणी या पदयात्रेचा समारोप झाला. (Arogyodu MLA Sunil Kamble communicates through padayatra)

 

 

 

पदयात्रेत भाजपा, राष्ट्रवादी,शिवसेना,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) आणि सर्व मित्रपक्षाचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रदीप गायकवाड, राष्ट्रवादी कॅन्टोन्मेंट अध्यक्ष नरेश जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आ) चे बाळासाहेब जानराव, शहर अध्यक्ष संजय सोनवणे, महेंद्र कांबळे, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष संदीप धांडोरे, भाजपा कॅन्टोन्मेंट अध्यक्ष सुशांत निगडे , नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष, लहुजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमान पक्ष, जनसुराज्य पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), भीमशक्ती, रयत क्रांती संघटना, जनता दल सेक्युलर, जय मल्हार क्रांती संघटना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, दलित पँथर, भीमसेना, युवा सुराज्य संघटना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, युवा रिपब्लिकन पार्टी, लहुजी साळवे बहुजन क्रांती आदी संघटना आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील सहभागी झाले.

 

 

पदयात्रेचे ठिकठिकाणी फटाके फोडून आमदार सुनील कांबळे यांचे स्वागत करण्यात आले. आरोग्यदूत अशी ओळख असलेल्या कांबळे यांनी कोरोना काळात कार्यकर्त्यांसह प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अनेकांचे प्राण वाचविले. त्यामुळे पदयात्रेच्या प्रत्येक टप्यावर महिलांच्या वतीने सुनील कांबळे यांचे औक्षण करुन स्वागत करत आहेत.

 

 

 

 

 

 

Local ad 1