Ravindra dhangekar : कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांना खासदार गिरीश बापटांनी दिला मोलाचा सल्ला !
पुणे ः भाजपने प्रतिष्ठेची केलेली कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजय झालेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विजयी झाल्यानंतर खासदार गिरीश बापट यांची भेट घेणार, अशी घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी आमदार धंगेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अकुंश काकडे यांच्या सोबत भेट घेतली. (MLA Ravindra Dhangekar met MP Girish Bapat)
खासदार गिरीश बापट हे सध्या महात्मा फुले संग्रहालय येथे आहेत. आमदार धंगेकर यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यांच्यासोबत कॉंग्रेस नेते अंकुश काकडे देखील होते. (MLA Ravindra Dhangekar met MP Girish Bapat)
Related Posts
कसब्यात भाजपने राज्यातील मंत्री मतदारसंघात प्रचाराला आले होते. त्याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅली आणि रोड शोचे आयोजनही करण्यात आले होते. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पराभूत करण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनाही भाजपने मैदानात उतरवले. नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या घालून बापट यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा प्रचार केला. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर धंगेकर यांनी बापट यांची भेट घेतली. तेव्हा बापट यांनी धंगेकरांना आशीर्वाद तर दिलाच पण मोलाचा सल्लाही दिल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी गिरीश बापट यांनीही धंगेकर यांना वडीलकीचा सल्ला दिला. नियोजन कर आणि नियोजनाप्रमाणे काम कर. तुला काही कमी पडणार नाही. काही अडचण आली तर माझा सल्ला घे, असे बापट म्हणाल्याची प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (MLA Ravindra Dhangekar met MP Girish Bapat)