आ. रविंद्र धंगेकर यांचा पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन , पोलिस आयुक्तांची बदली करा
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) अधिकार्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये घेतले. यामुळे तपास अधिकार्यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच अपघात प्रकरणात दोषी अधिकार्यांना पाठीशी घातल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed