मोठी बातमी : न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना सुनावली दोन वर्षाची शिक्षा 

नाशिक : नाशिक महापालिका आयुक्त यांना घेराव घालून शासकीय कामात आडथळा निर्माण केल्या प्रकरणी माजी राज्य मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. तर 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.  (Former state minister MLA Bachu Kadu sentenced to two years)

 

नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होता. हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दिव्यांगांच्या मागण्यांसाठी 2017 साली आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केलं होते. आंदोलना दरम्यान बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांवर हात उगारला होता. (Former state minister MLA Bachu Kadu sentenced to two years)

 यावेळी आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यात चकमक झाली होती. सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. दरम्यान याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी 2 वर्षांची शिक्षा नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. (Former state minister MLA Bachu Kadu sentenced to two years)

Local ad 1