महावितरणचा गलथान कारभार ; दहा दिवसांपासून कौठा गाव अंधारात (Mhavitaran)
महावितरणचे (Mhavitaran) स्थानिक अधिकारी उडवा-उडवीचे उत्तर देत आहेत. म्हणून कार्यकर्त्यांनी नांदेड येथील महावितरणचे मुख्य अभियंता यांच्याशी सपंर्क केला. परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. सिगल फेज रोहित्रची सध्या टंचाई असुन प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध होईल, असे सांगून त्यांनीही हात वर केले आहेत.
मुखेड येथील १३२ केव्हीतून गावास विज पुरवठा केला जात आहे. याची सुरुवात झाल्यापासूनच रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. गावातील २४ पैकी ८ सिगल फेस डि पी जळाले आहेत. उर्वरित १३ डि पी वर गावचा ताण येत असल्याने विज सतत चालू बंद होत आहे. तात्काळ विज पुरवठा सुरोळीत करवा, अशी मागणी करणारे निवेदन कार्यकारी अभियांता नादेड दिले आहे.– अर्चना शिवकुमार देशमुख, सरसपंच, कौठा, ता. कंधार