(Talk line) पाळीविषयी मासिक टॉक लाईनवर मिळणार सल्ला
पुणे : समाजात न चर्चेविल्या जाणाऱ्या मासिक पाळी या विषयावर तरुणायी बोलायला लागली आहेत. ‘समाजबंध’ या सामाजिक संस्था 2016 पासून मासिक पाळीतील आरोग्य व्यवस्थापन आणि स्वच्छता, महिला आरोग्य, लैंगिकता शिक्षण आणि लिंगभाव समानता या विषयांवर काम करत आहे. २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्या साधून मासिका टॉक लाईन म्हणजेच मासिक पाळी याविषयी मार्गदर्शन करणारी ही मराठीतील पहिलीच हेल्पलाईन सुरु केली जाणार आहे, अशी माहिती समाजबंधचे सचिन आशा सुभाष यांनी दिली. Talk line
जशा मदत करण्यासाठी विविध हेल्पलाईन आहेत, त्याच धर्तीवर परंतु थोडी वेगळी ही टॉक लाईन असेल. हे करण्यामागचे कारण म्हणजे आजपर्यंतच्या अनुभवावरून समाजबंधच्या असे लक्षात आले की अगदी बारा वर्षांच्या मुलीपासून ते ८९ वर्षांच्या आजीपर्यंत सर्वाना या विषयी व्यक्त व्हायचे असते, आपला अनुभव, आपलं मत कोणालातरी सांगायचं असतं मात्र, अशी समजून घेणारी, हक्काची जागा त्यांना कधी मिळतच नाही. त्यामुळे या टॉकलाईनमध्ये तीन सुविधा असतील. पाळीविषयी व्यक्त होणे, पाळीविषयी माहिती मिळवणे आणि या संबंधीत वैद्यकीय प्राथमिक सल्ला दिला जाणार असल्याचे सचिन यांनी सांगितले. Talk line
पहिली सुविधा म्हणजे ज्यांना कोणाला या विषयावर व्यक्त व्हायचे असेल, अशा महिलांचे मत, अनुभव व त्यांचे म्हणणे त्या इथे बिनधास्तपणे मांडू शकतील. समाजबंधचे कार्यकर्ते त्यांना व्यवस्थित ऐकून घेतील. कारण व्यक्त होणे हा या जोखडातून मुक्त होण्याचा पहिला टप्पा आहे असे आम्हाला वाटते. दुसरी सुविधा म्हणजे मार्गदर्शन. या विषया संबंधी कोणाचे काही प्रश्न, शंका असतील किंवा काही माहिती हवी असेल तर ती त्यांना समाजबंधचे कार्यकर्ते त्यांना मार्गदर्शन करतील. मनातील शंकांचे निरसन झाल्याशिवाय व शास्त्रशुद्ध माहिती मिळाल्याशिवाय या कडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन तयार होत नाही त्यामुळे योग्य माहिती समाजात जाणे खूप गरजेचे आहे. Talk line
तिसरी महत्वाची सुविधा म्हणजे कोणाला पाळीशी निगडित कोणत्याही आजारासंदर्भात स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांशी सल्ला मसलत करायची असेल, प्राथमिक सल्ला व मदत हवी असेल तर त्यांना डॉक्टरांशी जोडून दिले जाईल. यासाठी समाजबंधने अशा विषय तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार केली आहे, जी गरजूंना मार्गदर्शन करेल. ग्रामीण भागात सहसा स्त्री रोग तज्ञ नसतात त्यामुळे बऱ्याचदा योग्य निदान व योग्य उपचार न मिळाल्याने महिलांचे आजार पुढे बळावतात. यासाठी योग्य सल्ला मिळणे व प्राथमिक टप्यात असतानाच उपचाराला दिशा मिळणे खुप महत्वाचे असते. म्हणून ही सुविधा ही या टॉक लाईन असणार आहे. Talk line
टॉक लाईन अशी करेल काम टॉक लाईन साठी 7709488286 हा नंबर समाजबंधने जारी केलेला असून, वरील तिन्हीपैकी कोणत्याही सुविधेसाठी कोणत्याही वयोगटातील स्त्री किंवा पुरुष देखील फोन करू शकतात. ही सुविधा पूर्णपणे विनामूल्य असल्याने कोणीही याचा लाभ घेऊ शकते. फोन उचलल्यानंतर आपल्याला तिन्हीपैकी कोणत्या कारणासाठी फोन केला आहे, हे सांगावे लागेल. आलेल्या फोनला उत्तर देण्यासाठी फक्त शांतपणे ऐकून घेणारे, या विषयावर मार्गदर्शन करू शकणारे आणि या विषयातील तज्ञ डॉक्टर्स अशा तीन स्वतंत्र टीम बनवल्या आहेत. फोन कर्त्याच्या मागणीनुसार त्या टीम मधील जी व्यक्ती त्यावेळी बोलण्यासाठी उपलब्ध आहे, त्या व्यक्तीसोबत त्यांना जोडून दिले जाईल. अशाप्रकारे एकूण ३० कार्यकर्ते या टॉकलाईन साठी कायम उपलब्ध असतील. Talk line
पिरियड रिव्हॉल्यूशन (Period Revolution) २०२१ अभियान
मासिक पाळी दरम्यान स्त्रीला जोपर्यंत पुरेसा आराम, उत्तम आहार आणि चांगली वागणूक मिळणार नाही, तोपर्यंत फक्त स्वच्छतेनेच मासिक पाळीतील आरोग्य राखले जाईल असे नाही. म्हणून समाजबंधने २८ मे निमित्त महिनाभर (२८ एप्रिल ते २८ मे) या विषयांवर जनजागृती करायचे ठरवले आणि त्याला ‘पिरियड रिव्हॉल्यूशन २०२१’ असे नाव दिले.