(Friday) नांदेडमध्ये शुक्रवारी कोरोनाबाधित शंभरीच्या आत

नांदेड : कोरोनाची दुसरीलाट ओसरायल लागली असून, नांदेडकरांसाठी शुक्रवार हा काही प्रमाणात सुखद ठरला. कोरोना बाधित शंभरीच्या आत म्हणजेच 91 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 2 हजार 110 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. (Friday)

जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 87 हजार 727 एवढी झाली असून, यातील 83 हजार 392 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 1 हजार 773 रुग्ण उपचार घेत असून 76 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Friday)

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.दिनांक 20 मे 2021 रोजी लोट्स कोविड रुग्णालया लोहा येथील 54 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे सांगवी नांदेड येथील 34 वर्षाचा पुरुष, दिनांक 21 मे रोजी कद्रेकर कोविड रुग्णालय देगलूर येथे विरभद्रनगर देगलूर येथील 31 वर्षाचा पुरुष, क्रिटिकल केअर कोविड रुग्णालय येथे सिडको नांदेड येथील 72 वर्षाचा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे कुदळा ता. उमरी येथील 65 वर्षाच्या पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 838 एवढी आहे.


May 21 is Good Friday for Nandedkar
nanded corona update

बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 19, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 1, बिलोली 6, देगलूर 1, धर्माबाद 4, हदगाव 7, हिमायतनगर 7, कंधार 1, किनवट 6, लोहा 4, माहूर 2, मुदखेड 2, नायगाव 1, उमरी 1, यवतमाळ 2, हिंगोली 2, परभणी 1 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 2, नांदेड ग्रामीण 2, बिलोली 1, देगलूर 1, धर्माबाद 3, कंधार 2, किनवट 4, माहूर 3, नायगाव 1, भोकर 2, परभणी 1, यवतमाळ 1 असे एकूण 91 बाधित आढळले.आज जिल्ह्यातील 153 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जंम्बो कोविड सेंटर 19, हदगाव कोविड रुग्णालय 3, नायगा तालुक्यांतर्गत 1, देगलूर कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 20, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, बारड कोविड केअर सेंटर 8, अर्धापूर तालुक्यांतर्गत 21, माहूर तालुक्यांतर्गत 2, लोहा तालुक्यांतर्गत 3, भोकर तालुक्यांतर्गत 11, उमरी तालुक्यांतर्गत 4, खाजगी रुग्णालय 30 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.Friday

1 हजार 773 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 58, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 56, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 57, बारड कोविड केअर सेंटर 10,किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 44, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 18, देगलूर कोविड रुग्णालय 4, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 15, भोकर कोविड केअर सेंटर 2, नायगाव कोविड केअर सेंटर 8, उमरी कोविड केअर सेंटर 12, माहूर कोविड केअर सेंटर 11, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 9, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 30, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 5, बिलोली कोविड केअर सेंटर 34, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, एनआरआय कोविड केअर सेंटर 14, मांडवी कोविड केअर सेंटर 2, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 40, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 963, खाजगी रुग्णालय 346 व्यक्ती उपचार घेत आहेत.

Local ad 1