(Marriage Ceremony) लग्न सोहळ्यांना परवानी..!
मुंबई ः राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये येत्या सोमवारपासून सर्व व्यवाहर सुरुळीत होणार आहेत. सोमवारनतंर ज्यांचा लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. त्यांच्यासाठी सुखद बातमी आहे. लग्न सोहळ्यांसाठी परवानगी देण्यात आली. तर पुर्वीची 25 लोकांची उपस्थितीची अट रद्द करण्यात आली. (Marriage Ceremony)
महाराष्ट्र पाच टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा राज्य शासनाने घेतला आहे. अनलॉकबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होणार आहे. राज्य सरकारने केलेल्या वर्गीकरणानुसार पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत लग्न सोहळ्यास कोणतेही बंधने नाहीत. दुसऱ्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त 100 जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात असेलल्या जिल्ह्यात लग्न सोहळ्यास 50 जणांची उपस्थिती बंधनकारक असेल. तर चौथ्यामध्ये लग्न सोहळ्यास केवळ 25 जणांना उपस्थिती बंधनकराक आहे. (Marriage Ceremony)