(Crop insurance) पिक विम्यासाठी शेतकरी पुत्र पोहचले कृषी आयुक्तालयात

पुणे  : नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२० सालचा सोयाबीन, मुग, उडीद, कापुस, ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा मंजूर करावा. इफको टोकीयो कंपनी  विरुद्ध गुन्हा नोंद करवा. शेतकरी पुत्र थेट पुण्यातील कृषी आयुक्तालयात पोहोचले. यावेळी मागण्यांचे निवेदन आयुक्तालयातील आधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. The son of a farmer from Marathwada reached the Commissionerate of Agriculture for crop insurance

शेतकरी पुत्र माणिक चव्हाण,विठ्ठल बेळगे, बालाजी नायगावकर  कपिल बैस यांनी शुक्रवारी थेट पुण्याचे कृषी आयुक्त कार्यालय गाठले असून आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले आहे. खरीप हंगाम २०२० सालचा सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस, ज्वारी यासह आदी पिकांचा पिक विमा इफको टोकियो कंपनीकडे नायगांव तालुक्यातील शेतक-यांनी भरला होता. परंतु अतिवृष्टीमुळे सोयाबीन व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले होते. कृषी आयुक्तांच्या  दि. ५ मार्च २०२१ च्या पत्रान्ववे महसुल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार  ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. यात नायगांव तालुक्यातील सर्व महसूल मंडळे बाधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.  The son of a farmer from Marathwada reached the Commissionerate of Agriculture for crop insurance    

The son of a farmer from Marathwada reached the Commissionerate of Agriculture for crop insurance

         पिक विम्यापोटी शेतक-यांनी कोट्यवधी रुपये मरले असतांना तुटपूंजी मदत देवून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. पिकविमा भरताना शेतक-यांना वेगळीच भूलथापा इफको टोकियो कंपनी दिल्याने त्यांच्या प्रेमळ आश्वासनाला शेतकरी फसले.  फसवणूक केल्याप्रकरणी इफको टोकियो कंपनीवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावा. शासन नियमाप्रमाणे आणखी शेतकरी पात्र होतात याचे कारणे असे की नैसर्गिक आपत्ती फक्त तालुक्यातील काही शेतक-यांच्या शेतावर होऊ शकतो का? त्यामुळे तालुक्यातील सर्वच शेतक-यांचे पंचनामे ग्राहय धरुन मा. आयुक्त साहेबांनी तालुक्यातील सर्व शेतक-यांना पिकविमा मंजूर करून शेतक-यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.  The son of a farmer from Marathwada reached the Commissionerate of Agriculture for crop insurance

Local ad 1