मराठी चित्रपटला स्क्रिन न मिळणे आणि त्यातून होणारे सामाजिक नुकसान.. यावर प्रा. तुषार रुपनवर यांनी लिहिलेला लेख..

चित्रपटाला स्क्रिंनिंग मिळत नसल्याने दिग्दर्शक भाऊसाहेब कर्‍हाडे यांने भविष्यात चित्रपट करायची इच्छा नसल्याचे उद्गिन होऊन जाहीर केले. त्यावर समाजमाध्यमातून जोरदार चर्चा होत आहे. सामाजिक विषयाचे अभ्यासक प्रा. तुषार रुपनवर यांनी याविषयी केलेला ऊहापोह खास आपल्यासाठी…

 

ख्वाडा आणि बबन या राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या सिनेमानंतर भाऊराव कऱ्हाडे हे TDM हा चित्रपट घेऊन आलेत. ग्रामीण भागातून येऊन, घरातून कसलाही सिनेमाचा वारसा नसणारा एक तरुण, 22-23 व्या वर्षी संज्ञापन अभ्यासचा कोर्स पूर्ण करतो, चित्रपट सृष्टीत यायचं म्हणून स्वतः सिनेमा काढायचं ध्येय ठेवतो, झपाटल्या सारखं काम करत सिनेमासाठी स्वतःची जमीन काय विकतो, शहरी पार्श्वभूमी नसणारी, गौर वर्ण नसणारी आणि ज्यांना सेलिब्रेटी स्टेटस नाही अशी ग्रामीण भागातील कलाकार घेऊन  ख्वाडा सिनेमा बनवतो.  (Marathi film TDM not getting screen and social damage)

 

 

 

या सिनेमाला राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळतात. मात्र त्यामुळे सिने क्षेत्रातील प्रस्थापित शहरी लॉबी प्रचंड खवळून उठते, त्यांचा अक्षरशः जळफळाट होतो, अशी गावातली मुलं जर शहरांत येऊन सिनेमा बनवू लागली तर आपलं काय होणार? या भीतीने  या नवोदित दिग्दर्शकाची गळचेपी करू लागतात. आता त्याच दिग्दर्शकाने TDM हा उत्तम आशय पूर्ण असा चित्रपट आणला आहे, 1990-95  च्या दशकातील गावातील सोसायटीची निवडणूक, विहिरी खोदण्याचे काम त्यातील नायक करत असतो, तोच नायक ट्रॅक्टर चालक म्हणून गावातील मोठ्या हस्तींकडे काम करत असतो, मालकाच्याच मुलीवर त्याचं प्रेम असतं, पण घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत छोट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेतो, रान विकून लग्न केलं जातं, कर्ज काढून स्वतःचा ट्रॅक्टर घेतो, प्रस्थापित वाळू ठेकेदारांच्या कळपात घुसतो, त्यांच्याशी हातापायी देखील करतो, पण पुढे हप्ते थकतात म्हणून फायनन्स वाले ट्रॅक्टर वडून नेतात, अशी अत्यंत समर्पक मांडणी या सिनेमात केली आहे. कथा सांगून मी आपली सिनेमाची उत्सुकता निश्चितच संपवणार नाही, त्याचा क्लायमेक्स तर नाहीच सांगत. TDM ची सर्वच गाणी उत्तम आहेत, अभिनय, वेशभूषा, संवाद, सिनेमॅटोग्राफी अशा सर्वच आघाड्यांवर हा चित्रपट सरस आहे. मला तर खात्रीच आहे की या सिनेमाला राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील मिळतील. सिने सृष्टीत मोठे नाव असणारे व Film & Television Institute of India (FTII) माजी अधिष्ठाता समर नखाते सर आणि नामांकित दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल ही मंडळी TDM बद्दल खूप भरभरून बोलत आहेत, हा सिनेमा उत्कृष्ठ आहे हे सांगत आहेत. यातूनच या चित्रपटाचा दर्जा उत्तम आणि वरचा आहे हे सिद्ध होते.

 

 

 

आता या TDM सिनेमाला चित्रपटगृह मिळू दिली जात नाहीयेत, खूप प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायचा आहे पण थिएटर्स मिळू दिली जात नसल्याने चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार टीम काल फेसबुक लाईव्ह मध्ये ढसाढसा रडत होती. प्रस्थापित लॉबी त्याचा सिनेमा पडावा म्हणून द्वेशाने प्रयत्न करत आहे, ज्या दिग्दर्शकाने आपल्याला  ख्वाडा सारखा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट दिला त्याचं आपल्या भावाला जर आत्ता TDM सिनेमा बनवून रडायची वेळ येतं असेल तर ही आपल्या दृष्टीने शरमेची  आणि लाजिरवानी गोष्ट आहे. आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिले पाहिजे. भाऊराव कऱ्हाडे ने बनवलेला TDM हा सिनेमाचं मुळात गुणवत्ता पूर्ण आहे. त्यासाठी मोठं काहीच करायचं नाहीये तर आपल्या मित्र, कुटुंबिय आणि नातेवाईक यांसह TDM सिनेमा पहायला जायचं आहे. भाऊराव कऱ्हाडे या आपल्या गावाकडच्या बांधवाला खंबीर साथ देत जास्तीत जास्त लोकांना चित्रपट गृहात खेचून न्यायचं आहे. मार्केटिंगच्या या जमान्यात आपण मागे राहून चालणार नाही.

 

सुपरस्टार असणाऱ्या किंग खान शाहरुख खानला देखील पठाण सिनेमाच्या वेळी अनेक शहरात जाऊन आपल्या सिनेमाचे प्रमोशन करावे लागले होते. अनेक संघटना व सेक्युलर म्हणवल्या जाणाऱ्या संघटनांनी हा सिनेमा थिएटर बुक करून पाहिला होता. तसेच काहीच वेळ आज आपल्या वरती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना थिएटर पर्यंत नेऊन TDM हा सिनेमा दाखवायचा आहे. TDM सिनेमा बद्दल  सोशल मीडियातून लिहायचं आहे, तोंडी प्रचार  करायचा आहे. आत्ता जर आपला हा गावाकडील तरुण दिग्दर्शक ऐन उमेदीत खचला आणि त्याने काल माध्यमात सांगितल्या प्रमाणे सिनेमा बनवणे थांबवलं तर पुढे भविष्यात नवोदित चित्रपटाकडे कोणी वळणार नाही. ही आत्ताच्या काळातली एक सांस्कृतिक लढाई आहे ती आपल्याला जिंकायची आहे. TDM सिनेमा जास्तीत जास्त जणांनी पाहायचा,  हे जर आपण आत्ता नाही केलं तर भविष्याकाळ आपल्याला माफ करणार नाही.

प्रा. तुषार रूपनवर, सामिजिक विषयाचे अभ्यासक,पुणे.

Local ad 1