(Maratha risarweshan) … तर विरोधकांनी स्वतः पाठ थोपटून घेतली असती  : अजित पवार 

पुणे : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. जर न्यायालयात आरक्षण टिकले असते तर आमच्यामुळेच आराक्षण मिळाले, असे सांगत विरोधक स्वतःची पाठ थोपटून घेतले असते. पंरतु न्यायालयात निकाल विरोधात गेला. त्यामुळे विरोधक बिथले असून, ते आमच्यावर आता टीका करून राजकारण करत आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टिका केली. (Maratha risarweshan)

पुणे जिल्हा परिषदेमध्ये “शिवस्वराज्य दिन” कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सक्षमपणे बाजू मांडली. मात्र दुर्दैवाने निर्णय विरोधात गेला. या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया न समजून घेता, विरोधक महाविकास आघाडी सरकारला दोषी ठरवत आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या वकिलांनी बाजू मांडली. त्याच वकीलांनी सर्वोच्च न्यायालयातही बाजू मांडली. (Maratha risarweshan)

त्यांचा आवाका किती हे आम्हांला माहीत आहे
माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून स्वतःला बॉम्बने उडवून घेण्याचा इशारा दिला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, काही जण भावनेच्या आहारी जाऊन काहीही बोलत आहेत. कायदा आणि संविधानात काय आहे, ते हे पाहत नाही. ही लोक काही काळ आमच्या सोबत होती. त्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांना महत्व देत नाही. (Maratha risarweshan)

संभाजीराजे यांच्या मुद्यांसंधार्भात लवकरच बैठक
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाह इतर प्रश्‍नांवर छ.संभाजीराजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्याविषयी छ. संभाजीराजे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे, परंतु त्यांनी 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळा होऊ, द्या असे सांगितले आहे. तसेच त्यांनी आपले प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही मांडले आहेत. त्यावर लवकरच महाविकास आघाडी सरकार चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. (Maratha risarweshan)

Maratha risarweshan

जी गोस्ट 14 महिन्यांपूर्वी घडली त्याचं आता काय?
गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी उडत आहे. आ.चंद्रकांत पाटील यांनी 54 आमदारांच्या पंठिंब्याच्या पत्राबाबत वक्तव्य केले आहे. त्याविषय बोलताना अजित पवार म्हणाले, जी गोस्ट 14 महिन्यांपूर्वी घडली त्याचं आता काय? असा प्रश्‍न उपस्थित करुन ज्यांना काही उदयोग नाही, ते मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत, असा टोला अजित पवार यांनी आ. पाटील यांना लगावला. (Maratha risarweshan)

Local ad 1