Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी (दि. 30 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, Minister of Higher and Technical Education and Chairman of the Cabinet Sub-Committee) यांनी माहिती दिली. (Maratha Reservation. Cabinet sub-committee meeting on Monday)
बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा (Maratha-Kunbi, Kunbi-Maratha) जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) (Justice Sandeep Shinde (Retd.)) यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.