...

मोठी बातमी : मराठा (Maratha) अंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे

खासदार छत्रपती संभाजी महाराज व आमदार रोहित पवारांनी मानले सरकारचे आभार

मुंबई : मराठा समाजाची एक महत्वाची मागणी राज्य सरकारने आज मान्य केली आहे. मराठा समाजाने हाती घेतलेल्या आरक्षणाच्या लढ्यात (The Maratha community took up the fight for reservation) दाखल झालेले सर्व गुन्हे राज्य सरकारने सरसकट मागे घेण्याची घोषणा केली आहे. (All the crimes were withdrawn by the state government) सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी स्वागत करत सरकारचे आभार मानले आहेत. (Maharashtra CM directs withdrawal of cases against Maratha activists)

 

आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यात मोठा लढा उभारला. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी राज्यभरात लाखोंच्या संख्येने मुकमोर्चे काढले. आरक्षणासाठी काहींनी प्राणही गमावले. दरम्यान आरक्षणाचे अंदोलन काही काळ हिंसकही बनले होते. यामुळे अनेक अंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. (Police have registered a case against Andolk) हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्याने केली जात होती.

 

खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी (Chhatrapati sambhaji maharaj) आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. राज्य सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याने संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. तर मराठा तरुणांनीही छत्रपती संभाजी महाराजांचे आभार मानले आहेत. The Maratha community took up the fight for reservation)

 

आमदार रोहित पवारांनी मानले सरकारचे आभार
कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Mla Rohit Pawar) यांनीही राज्य सरकारने मराठा अंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

Local ad 1