पुण्यातून मनोज जरांगे पाटिल यांनी विधानसभा निवडणुकीतउमेदवार पडायचे की द्यायचे याविषयी दिली अपडेट 

 

पुणे :  “आरक्षण मिळवायचे असेल तर आपली माणसे विधानसभेत हवीत. २८८ जागांची चाचपणी पूर्ण झाली असुन, लवकरच आमचे उमेदवार पुढं येतील,”असे त्यांनी सांगितले. तसेच, २९ तारखेला अंतरवली येथे मोठा निर्णय घेण्याचे संकेत मनोज जरांग्गे पाटिल यांनी दिले आहेत. (Manoj Jarange Patil gave an important update about the assembly elections)

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनजागृती व शांतता रॅलीला पुण्यात सहा तासांच्या विलंबाने सुरुवात झाली. या रॅलीत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. सकाळपासूनच भर पावसात मनोज जरांगे पाटील यांची वाट पाहणारे समर्थक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

 

 

 

“पंकजा मुंडे यांनी माझे आभार मानले पाहिजे, त्यांना विधान परिषद तरी भेटली मी त्यांना पडा असे बोललो नाही,” असे त्यांनी सांगितले. “प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, पुढं काही होऊ शकतं,” असे त्यांनी नमूद केले. आरक्षणाची लढाई “मी पुण्यातील समाजाचा आभार मानतो, आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत ते राहिले. ही लढाई माझी एकट्याची नाही, सर्व समाजाची आहे, आणि मी समाजासोबत शेवटपर्यंत राहणार आहे,” असे जरांगे म्हणाले.

 

 

 

मराठा समाजातील अधिकाऱ्याना त्रास दिला जात असुन, समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शासकीय सेवेत नोकरी मिळत नाही, मिळली तर त्यांना वर्षांवर्षे एकाच पदावर काम करावे लागते. त्यांनतर आरक्षणाचा लाभ घेउन येणारा अधिकारी मोठया पदावर जातो, परंतू मराठा समाजातील कर्मचारी आणि अधिकारि त्याच ठिकाणी काम करत असतो.

 

विधानसभेत छगन भुजबळांनी आरक्षणाला विरोध केला. त्याचवेळी सभागृहामध्ये मराठा समाजातील आमदार उपस्थीत होते, ते काहीही बोलले नाहीत. त्यामुळे समाजासाठी बोलणारे आमदार पाठवायचे आहेत. त्यामुळे राजकिय पक्षातील नेत्यांना उद्यापासून मराठा आरक्षण संदर्भात विचारा, असे आवाहन मनोज जरांगे पाटिल यांनी केले आहे.

 

 

 

 

Local ad 1