ACB Trap News | Parbhani : अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा व्यवस्थापक लाच घेताना अटक

ACB Trap News | Parbhani परभणी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ (मर्या), परभणी यांच्याकडून कर्ज मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचा जिल्हा व्यवस्थापक आणि अन्य एक कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. (Manager of Annabhau Sathe Development Corporation arrested while taking bribe)

 

चंदू किसनराव साठे (जिल्हा व्यवस्थापक, वय 56 वर्ष), क्लर्क अविनाश प्रकाश मुराळकर (वय 35 वर्ष) या दोघांना लाच घेताना एसीबी पथकाने अटक केली.

 

मंडप डेकोरेशन व्यवसायाकरिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या), कार्यालय परभणी येथे 1,00,000 रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला होता. दिनांक 13 जुलै रोजी तक्रारदार व त्यांच्या आत्या हे व्यवस्थापक साठे याला भेटून मंजूर कर्जाचा धनादेश देण्यासाठी विनंती केली. त्यावेळी साठे याने धनादेश देण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत लाचेची मागणी केली.

 

 

अविनाश मुराळकर यानेही कर्ज मंजुरीचा चेक देण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागतील, असे म्हणून त्यांनीही लाचेची मागणी केली. बुधवारी ( दि.19/07/2023) पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. त्यात दोघांनी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

 

ACB Trap News Parbhani

 

सापळा कार्यवाहीत अविनाश प्रकाश मुराळकर यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली. दोघांवर पोलीस ठाणे नवा मोंढा, परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ.राजकुमार शिंदे (Superintendent of Police of Nanded Zone Dr.Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर (Deputy Superintendent of Police Ashok Ipper), सापळा/तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्यासह पथकात पोह / चंद्रशेखर निलपत्रेवार, मपोह / सिमा चाटे पोकॉ/ अतुल कदम, कल्याण नागरगोजे अँटी करप्शन ब्युरो,परभणी सहभागी होते.

 

Local ad 1