(Electricity network) राज्यातील वीज वाहिन्यांचे जाळे होणार मजबूत
मुंबई : राज्यातील अनेक भागात अजूनही कमी दाबाने वीज पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करवा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ग्राहकांना योग्य दाबाचा व अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी येत्या 5 वर्षात राज्यात विविध ठिकाणी उपकेंद्रे, अतिउच्चदाब वीज वाहिन्यांचे जाळे उभारले जाणार आहे, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी सांगितले. (Mahavikas Aghadit new project for electricity network in Maharashtra)
मंत्रालय येथे पंचवार्षिक योजनेअंतर्गत महापारेषणने सादर केलेल्या पंचवार्षिक योजनेचा आढावा ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मेळघाट सारख्या दुर्गम भागातही योग्य दाबाचा वीज पुरवठा करण्यात यावा व दुर्गम भागातील एकही गाव अथवा पाडा अंधारात राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी महावितरण व महापारेषण प्रशासनाला दिले.
सन 2019-20 ते 2024-25 या पाच वर्षात राज्यात एकूण 87 अतिउच्चदाब वीज उपकेंद्रे उभारण्यात येणार असून, यामुळे 30 हजार एमव्हीए एवढी क्षमता वाढ होणार आहे. तर 10 हजार 707 किमी एवढया लांबीच्या अतिउच्चदाब वाहिन्यांचे नवीन जाळे निर्माण केले जाणार आहे. त्यासाठी 10 हजार 823 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. (Mahavikas Aghadit new project for electricity network in Maharashtra)