...

Mahavikas Aghadi Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठी घोषणा ; काय आहे ‘महाराष्ट्रनामा’मध्ये

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या (Mahavikas Aghadi) या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे (Congress president Mallikarjun Kharge) आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार संजय राऊत (MP Supriya Sule, MP Sanjay Raut) आदी उपस्थित होते. या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला, तरुण आणि आरोग्य क्षेत्राच्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा आणि आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

 

 

*E- KYC Mandatory for Ration Card । रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ; KYC करा अन्यथा धान्य मिळणे होईल बंद*👇👇
https://www.mhtimes.in/e-kyc-mandatory-for-ration-card/

 

 

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय काय?

  • शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूटआ
  • रक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
  • जाती जणगणनना करणार
  • 300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
  • दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
  • 2.5 लाख नोकरभरती करणार
  • शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
  • शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
  • सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
  • अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
  • बार्टी,महाज्योती,सारथी मार्फत शिष्यवृत्ती वाढवणार
  • एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसात लावणार
  • महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
  • महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
  • महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडावर फेरविचार करू
  • शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
  • सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
  • महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?
  • महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
  • महिलांचा बस प्रवास मोफत करणार
  • सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
  • महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
  • जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार

 

 

Local ad 1