Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे गंभीर आरोप

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील 150 मतदारसंघातील दहा हजार मते काढून टाकून त्या ठिकाणी बोगस मतदान मतदार नोंदणी एका ॲपच्या माध्यमातून  होत आहे, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. हे कटकारस्थान करणारे सूत्रधार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत, असा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.  ज्या मतदारसंघांमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, ते मतदारसंघ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समोर आणल्याचा दावा केला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर आम्ही या विरोधात मोर्चा काढू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने दिला आहे.  (Mahavikas Aghadi leaders make serious allegations against the state government and the Election Commission)