...

(MP Sharad Pawar) महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद नाहीत : शरद पवार

बारामती :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकरामध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरु झाली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे स्पष्ट करत सरकारमध्ये असणे ही एक बाजू आहे. तर दुसरीकडे संघटनात्मक पक्ष बांधणी करत आपला पक्ष वाढविणे हे स्वाभाविक आहे. तो प्रत्येकाला हक्क असल्याचेही खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले.  (MP Sharad Pawar)

Congress state president Nana Patole has given the slogan of self reliance. Thus began the discussion of differences within the Mahavikas Aghadi government. NCP MP Sharad Pawar said that there are no differences in the Mahavikas Aghadi government. Being in government is one side. On the other hand, MP Sharad Pawar clarified that it is natural for everyone to expand their party organizationally.

बारामतीत येथे गोविंदबागेत रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते.  सरकार चालविताना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे व सुभाष देसाई तर राष्ट्रवादीकडून अजित पवार व जयंत पाटील हे सदस्य समन्वयाचे काम करतात. हे सगळे एकत्र बसून निर्णय घेत असतात. सरकार स्थिर असून, याच पद्धतीने पुढे जाण्याची सगळ्यांची  भूमिका आहे. त्यामुळे सरकार आपल्या पाच वर्षाचा कार्याळ पुर्ण करेल असा मला विश्वास आहे. 


He was talking to reporters on Sunday at Govindbagh in Baramati. Many questions arise when running a government. Therefore, Balasaheb Thorat and Ashok Chavan from Congress, Eknath Shinde and Subhash Desai from Shiv Sena and Ajit Pawar and Jayant Patil from NCP work as coordinators. They all sit together and make decisions. The government is stable and everyone has a role to play. So I am confident that the government will complete its five-year term

सरकार स्थापन होतानाच ते किमान समान कार्यक्रमांच्या आधारावर स्थापन झाले आहे. सरकार चालविताना काही प्रश्न निर्माण झाले तर तिन्ही पक्षातील सहा नेत्यांकडे समन्वयाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्यामुळे सरकारमध्ये सगळं व्यवस्थित सुरु आहे. असे खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Since the formation of the government, it has been formed on the basis of at least similar programs. Six leaders from the three parties have been tasked with co-ordinating if any issues arise while running the government. So everything is going well in the government. This was explained by MP Sharad Pawar.

Local ad 1