...

मुस्लीम समाज महाविकास आघाडीचा खेळ बिघडण्याची शक्यता !

पुणे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अल्पसंख्याक समाजाने (Minority Community) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)  उमेदवारांना भरभरून मते दिली. आता विधानसभा निवडणुकीत मुस्लीमांना सत्तेत वाटा मिळेल की नाही, यावर साशंकता निर्माण आहे. कारण राज्यातील मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडी चर्चा करत नाही. त्यामुळे मुस्लीम समाज वेगळा विचार करण्याच्या भुमिका आला आहे.  त्यामुळे राज्यातील मुस्लीम समाज महाविकास आघाडीचा खेळ बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, असा अशा इशारा  पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. यावेळी एडवोकेट आयुब शेख, अंजुम इनामदार, मौलाना निजामुद्दीन, मुस्लिम धर्मगुरू, कारी इद्रिस अन्सारी, मौलाना रझीन अश्रफ उपस्थित होते. (Muslim community has warned Mahavikas Aghadi about the Vidhan Sabha candidature)