पुणे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) अल्पसंख्याक समाजाने (Minority Community) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना भरभरून मते दिली. आता विधानसभा निवडणुकीत मुस्लीमांना सत्तेत वाटा मिळेल की नाही, यावर साशंकता निर्माण आहे. कारण राज्यातील मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार देण्याविषयी महाविकास आघाडी चर्चा करत नाही. त्यामुळे मुस्लीम समाज वेगळा विचार करण्याच्या भुमिका आला आहे. त्यामुळे राज्यातील मुस्लीम समाज महाविकास आघाडीचा खेळ बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुस्लीम समाजाला उमेदवारी द्या, असा अशा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे. यावेळी एडवोकेट आयुब शेख, अंजुम इनामदार, मौलाना निजामुद्दीन, मुस्लिम धर्मगुरू, कारी इद्रिस अन्सारी, मौलाना रझीन अश्रफ उपस्थित होते. (Muslim community has warned Mahavikas Aghadi about the Vidhan Sabha candidature)
लोकसभा निवडणुकीत “जिसकी जितनी आबादी उतनी सत्ता में हिस्सेदारी” असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केले होते. त्या वक्तव्याची आठवण आज मुस्लीम समाजातील कार्यकर्ते करत आहेत. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघात सुमारे दिड लाखांहुन अधिक मुस्लीम मतदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा, या मागणीसाठी आग्रही आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 जागा पैकी एकही ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार दिला नाही. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही मुस्लीम समाजाला बाजुला सारण्यात आले, इतिहासात पहिल्यांदा विधान परिषदेत एकही मुस्लिम प्रतिनिधी राहिला नव्हता. दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने एका उमेदवाराची शिफारस केली आणि एक आमदार विधानपरिषदेत आला आहे. मात्र, विधानसा निवडणुकीत उमेदवारीच दिली गेली नाही, तर सत्तेत काय वाटा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे तारीख जाहीर झाली आहे त्यासंबंधी सर्व राजकीय पक्ष व उमेदवार आपापल्या मतदारसंघात कामाला लागल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चेच्या फैऱ्या झडत आहेत. जागा वाटप अंतिम झाल्यानंतर उमेदवारांची घोषणाही होईल. महाविकास आघाडीत काम करणाऱ्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागतली. त्यांना उमेदवारी दिली नाही, तरीही त्यांनी महाविकास आघाडीसाठी मनापासून काम केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटले कार्यकर्ते
विधानसभा निवडणुकीत 15 टक्के जागा आल्पसंख्याक समाजातील मुस्लीन, ख्रिचन, बौद्ध (Muslim, Christian, Buddhist) समाजाला द्यावे, अशी मागणी महाविकास आघाडीत शिर्ष नेत्यांना केलेली आहे. मात्र, त्यांच्या सकारात्मक चर्चा होताना दिसत नाही, त्यामुळे नाराजीची सूर दिसून येत आहे.
पुण्यात झाल्या 20 पेक्षा अधिक बैठका
पुणे शहरातील राज्यपातळी व जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या 20 ऊन अधिक संघटना, मुस्लिम धर्मगुरू, शैक्षणिक क्षेत्रात उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांना एकत्रित करून चिंतन बैठकी केल्या आहेत. बैठकीत सर्वांच्या मताने निर्णय घेण्यात आला की पुणे जिल्ह्यात असलेल्या 21 विधानसभा मतदारसंघांपैकी किमान दोन तरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांना उमेदवारी देऊन मुस्लिमांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, अशी भुमिका त्या मांडण्यात आली.
हडपसर मध्ये 31 टक्के मतदार मुस्लीम
हडपसर विधानसभा मतदारसंघात 31 टक्के मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. त्या ठिकाणी मुस्लिम उमेदवार द्यावा. विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना सत्तेत भागीदारी दिली नाही, तर यावेळी महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये, असे इशारा देण्यात आला आहे.