...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा गुरुवारी पासून मिळणार लाभ

मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme) अल्प मुदतीच्या पीक कर्जाची (Short term crop loan) नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ (Incentive benefits up to 50 thousand) योजनेचा शुभारंभ गुरुवारी (दि. 20 ऑक्टोबर) मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमास सहकार मंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save), कृषी मंत्री अब्दुल सत्तार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री  सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा आदी उपस्थित राहणार आहेत.

(Agriculture Minister Abdul Sattar, Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil, Forest Minister Sudhir Mungantiwar, Tribal Development Minister Vijay Kumar Gavit, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, Rural Development Minister Girish Mahajan, Labor Minister Suresh Khade, Public Health Minister Prof. Dr. Tanaji Sawant, Industries Minister Uday Samant, Ports and Mines Minister Dada Bhuse, Food and Drug Administration Minister Sanjay Rathod, Water Supply and Sanitation Minister Gulabrao Patil, Employment Guarantee Scheme and Horticulture Minister Sandipan Bhumre, School Education Minister Deepak Kesarkar, Public Works (Public Enterprises Excluding) Minister Ravindra Chavan, State Excise Minister Shambhuraj Desai, Tourism Minister Mangal Prabhat Lodha)

सुमारे 7.15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण

     नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017 – 18, सन 2018 – 19 आणि सन 2019 – 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांत पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात  करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 7. 15 लाख पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. दि. 20 रोजीच्या कार्यक्रमात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केल्याबदल निवडक पात्र शेतकरी बांधवांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  (Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme)

योजनेसाठी निकष

  •  कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
  • योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
  • सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी देखील या योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकऱ्याचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस देखील प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

योजनेची कार्यपद्धती

  •   या योजनेंतर्गत योजनेच्या निकषांची पूर्तता केलेल्या कर्जखात्यांची माहिती राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
  •  प्राप्त याद्यांचे संगणकीय संस्करण करण्यात येऊन पात्र लाभार्थींची यादी निर्गमित करण्याची कार्यवाही शासन स्तरावर करण्यात येईल.
  •   पात्र लाभार्थींच्या याद्या विशिष्ट क्रमांकासह संबंधीत बँकेस तसेच विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे उपलब्ध करण्यात येतील.
  •    सदर यादीमधील संबंधीत शेतकऱ्यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे.
  •   आधार प्रमाणीकरण नंतर संबंधीत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहनपर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.

कर्जमुक्ती योजनेसाठी निकषात न बसणाऱ्या व्यक्ती

  • महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  • महाराष्ट्र राज्यातील आजी / माजी मंत्री / राज्यमंत्री, आजी / माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी / माजी विधानसभा / विधान परिषद सदस्य.
  • केंद्र सरकार व राज्य शासनाचे सर्व अधिकारी / कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारापेक्षा अधिक असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  •  राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण, एस. टी. महामंडळ इ. ) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
  • शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
  •  निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
  •  कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजारांपेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)
Local ad 1