महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी मुदतवाढ
नादेड : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना घेता यावा यासाठी शासनाने सोमवार 31 जानेवारी 2022 पर्यत आवश्यक ती कागदपत्रे व माहिती बँकांकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. (Mahatma Jotirao Phule Farmers Extension for Debt Relief)
मयत लाभार्थी शेतकऱ्यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे बँकांकडे जमा करुन कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. मुकेश बारहाते यांनी केले आहे. (Mahatma Jotirao Phule Farmers Extension for Debt Relief)
राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 ही शासन निर्णय दि. 27 डिसेंबर, 2019 अन्वये कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत मयत कर्जदारांच्या बाबतीत सुधारित / अद्यावत माहिती संगणकीय प्रणालीवर (पोर्टल) सादर करण्यासाठी यापुर्वी 22 ऑक्टोंबर 2021 ते 8 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदत दिली होती. (Mahatma Jotirao Phule Farmers Extension for Debt Relief)