महाराष्ट्रातील पहिले 3D post office  पुण्यात उभे रहाणार ; कसा असेल पोस्ट ऑफिस 

जागा निश्चित करण्यात आली लवकरच कामाला सुरुवात होईल

Maharashtra’s first 3D post office । पुणे :  टपाल पोस्ट सेवा ही संवादाची पहिली सेवा असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे पोस्ट सेवा बंद पडते की काय, अशी भिती व्यक्त केली जात आहे. परंतु पोस्ट विभाग आपल्या कामांमध्ये नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करुन स्पर्धेत टिकण्यसाठी प्रयत्न करत आहे. आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली लवकरच कामाला सुरुवात होईल. यापूर्वी बेंगळूरूमध्ये देशातील पहिले या प्रकारचे टपाल कार्यालय बांधण्यात आले आहे. (Maharashtra’s first 3D post office will stand in Pune; How will the post office be?)


शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन टपाल कार्यालयाने गेल्या काही वर्षात उपनगरांमध्ये नवीन टपाल कार्यालये सुरू केली आहेत. या वर्षभरातही आंबेगाव, बावधन, शिजानीनगर, सहकारनगरमध्ये (Ambegaon, Bavadhan, Shijaninagar, Sahkarnagar) नवीन टपाल कार्यालये सुरू होत आहेत. यातील सहकारनगरला ४११०७२ हा नवीन पिनकोड मिळाला आहे. तिथे पोस्टाची स्वत:ची जागा असल्याने पुण्यातील पहिले थ्रीडी प्रकारातील पोस्ट ऑफिस बांधण्यात येणार आहे. या बांधणी प्रक्रियेत आधुनिक थ्रीडी प्रिटिंगचा वापर केला जातो. आधुनिक डिझाइन पद्धतीने वास्तूचा आकार निश्चित करून माणसांच्या कमीत कमी सहभागातून कमी दिवसात ही इमारत उभी राहते. भारतात ही संकल्पना नवीन असून बेंगळूरूमध्ये गेल्या वर्षी टपाल कार्यालयाची पहिली इमारत बांधण्यात आली, आहे.

 

Ratan Tata Death । रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड म्हणाली गुडबाय माझ्या जिवलग मित्रा…


दरम्यान, पुढील महिनाभर आम्ही परदेशातील दिवाळी फराळ (Diwali snacks) कुरिअर सेवेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही नव्याने या उपक्रमाला सुरुवात केली आणि पहिल्याच वर्षी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आमच्या विभागाला ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे यंदा आम्ही परदेश फराळाच्या पॅकिंगपासूनची सेवा टपाल कार्यालयात सुरू केली आहे. नागरिकांना १३० देशांना फराळ पाठविण्याची एवढेच नव्हे तर घरी येऊन फराळ साहित्य घेऊन जाण्याची सुविधाही आम्ही उपलब्ध केली आहे. या दिवाळीत १ कोटी रुपयांचे उत्पन्नाचे ध्येय आम्ही निश्चित केले आहे, असे ड्युलेट यांनी सांगितले.

 

1874 साली स्थापन झालेल्या युनिव्हर्सल पोस्टल युनियन (यूपीयू)च्या वर्धापन दिनानिमित्त 9 ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. जागतिक टपाल दिनाचा उद्देश हा जनसामान्य आणि व्यवसायांच्या दैनंदिन जीवनात डाक विभागाची भूमिका तसेच जागतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात त्याचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. या वर्षीच्या जागतिक पोस्ट दिनाची थिम ‘150 Years of Enabling Communication and Empowering Peoples Across Nations’ ही आहे.

 

Maharashtra's first 3D post office will stand in Pune How will the post office be

 

या वर्षी, राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्याची रूपरेखा भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात भारतीय डाक विभागच्या उदयोन्मुख भूमिकेच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. मुलींच्या सक्षमीकरणावर भर देऊन वित्तीय सशक्तिकरण, DNK सारख्या मेल आणि पार्सल सेवा, दुर्गम, डोंगराळ, सेवा नसलेल्या आणि बँक नसलेल्या भागात ऑन-द-स्पॉट बँकिंग सेवा (On-the-spot banking services) यावर भर दिला जाणार आहे.

 

 

दहा पोस्टल डिव्हिजन, एक रेल्वे मेल सर्व्हिस डिव्हिजन, एक मेल मोटार डिव्हिजन,एक सिव्हील डिव्हिजन आणि 31 पोस्टल सब डिव्हिजन यांनी तयार झालेल्या पुणे टपाल क्षेत्राच्या कार्यकक्षेमध्ये पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर असे चार जिल्हे समाविष्ट आहेत. या सर्व विभागांचे कार्य सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी सुमारे सात हजार कर्मचारी दहा हेड पोस्ट ऑफिसेस 486 सब पोस्ट ऑफिसेस, 2183 ब्रांच पोस्ट ऑफिसेस, 18 मेल ऑफिसेस च्या माध्यमातून आपली सेवा देतात.

 

टपाल विभागामार्फत मेल, बँकिंग, इन्शुरन्स अशा विविध क्षेत्रामध्ये सेवा प्रदान केल्या जातात. त्याकरिता कोअर बँकिंग सोल्युशन, डिजिटल एडव्हान्समेंट ऑफ रुरल पोस्ट ऑफिसेस फॉर न्यू इंडिया, डायनामिक क्यू आर कोड अशा तंत्रज्ञानांचा उपयोग करून सेवा अधिक समाजाभिमुख केल्या आहेत. भारतातील शेवटच्या खेड्यापर्यंत टपाल वितरण तर टपाल विभाग करतच असतो. त्याचबरोबर पुणे क्षेत्रातील 9 पार्सल पॅकिंग युनिट आणि डाक निर्यात केंद्रांमुळे परदेशात पत्र आणि पार्सल (रजिस्टर तसेच स्पीड पोस्ट) पाठविण्याच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  तसेच कंपन्या आणि संस्था मोठ्या प्रमाणावर (बल्क) टपाल पाठविण्यासाठी टपाल विभागालाच पसंती देत आहेत. पार्सल हब मुळे पार्सल हंड्लिंग अधिक सोपे आणि जलद होते.

 

तळागाळापर्यंत कोणत्याही बँकेतील पैसे घरपोच देण्याची AePS सुविधा केवळ भारतीय टपाल खात्यामार्फत राबविली जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने गेल्या सहा वर्षात सुमारे 32 लाख बँक खाती, लाखो सामान्य विमा विविध नामांकित विमा कंपन्या (बजाज, टाटा, निवा बुपा, स्टार हेल्थ) यांचे सोबत टाय अप करून उघडल्या आहेत , हजारो गृहकर्ज आणि वाहन कर्ज ,लाखो बालकांचे आधार कार्ड तयार करणे तसेच आधार कार्डमध्ये मोबाईल किंवा पत्याचे बदल करणे इत्यादी विविध सेवा प्रदान करत जनमानसावर आपली छाप उमटविली आहे.पुणे क्षेत्राने 74.38 लाख पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खाती सुरु ठेवत महाराष्ट्र सर्कल मध्ये समाविष्ट असलेल्या सहा क्षेत्रामध्ये (गोवा, औरंगाबाद, नागपूर, नवी मुंबई, मुंबई आणि पुणे) आघाडी घेतली आहे.

Local ad 1