Maharashtra Vidhansabha Election 2024  । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजणार 

नवी दिल्ली । भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhan sabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.