Maharashtra Vidhan Sabha Election 2024 । काँग्रेसकडून नांदेडमधील ९ विधानसभेसाठी १२३ इच्छुक

अशोक चव्हाणांच्या भोकर विधानसभा मतदार संघासाठी 15 जणांनी दिल्या मुलाखती

Maharashtra Vidhan Sabha Election 2024। नांदेड : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजले असून, नांदेड जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी तब्बल 123 इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. माजी मंत्री विश्वजीत कदम (Former minister Vishwajit Kadam) आणि काँग्रेसचे राज्य सहप्रभारी कुणाल चौधरी (Congress state co-incharge Kunal Chaudhary) यांनी हॉटेल चंद्रलोक येथे इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. देगलूर विधानसभा मतदारसंघासाठी 29, किनवट मध्ये ६ इच्छुकांनी मुलाखती दिले आहेत. तर अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघात काँग्रेसकडून तब्बल 15 जण इच्छुक आहेत.  (123 aspirants from Congress for 9 assembly seats in Nanded)

 

नांदेड जिल्ह्यातील किनवट, हादगाव , मुखेड ,देगलूर,  नायगाव , लोहा – कंधार , भोकर , नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण (Kinwat, Hadgaon, Mukhed, Degalur, Naigaon, Loha-Kandahar, Bhokar, Nanded North and Nanded South) या नऊ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या पक्षाचे माजी मंत्री विश्वजीत कदम आणि राज्याचे सहयोगी प्रभारी कुणाल चौधरी यांनी हॉटेल चंद्रलोक येथे मुलाखती घेतल्या. प्रारंभी विश्वजीत कदम आणि कुणाल चौधरी यांनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सत्वन केले. त्यानंतर पक्ष कार्यालयात दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. (123 aspirants from Congress for 9 assembly seats in Nanded)

 

Nanded Vidhan Sabha Election 2024 नांदेड जिल्ह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार ? जाणून घ्या

किनवट विधानसभा मतदारसंघासाठी सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. हादगाव मध्ये 11 , मुखेड 12,  देगलूर 29,  नायगाव सात , लोहा-कंधार नऊ, भोकर 15, नांदेड उत्तर 20, नांदेड दक्षिण 10 अशा एकूण 123 इच्छुकानी मुलाखती दिल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथे इच्छुकांची सर्वाधिक गर्दी दिसून आली.  माजी आमदार अविनाश घाटे, सुरेश गायकवाड, डॉ. दिनेश निखाते यांच्यासह अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024

 नायगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मीनल खतगावकर यांच्यासह अन्य सहा जणांनी मुलाखती दिल्या असून, यात माजी सभापती संजय बेळगे , केदार पाटील साळुंखे यांचा समावेश आहे . माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघात अशोकराव चव्हाण यांच्या विरुद्ध दंड थोपटण्यासाठी तब्बल 15 जणांनी मुलाखती दिल्या आहेत.  यात पप्पू पाटील कोंडेकर,  बालाजी गाढे पाटील यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात तब्बल वीस जणांनी मुलाखती दिल्या असून माजी मंत्री डीपी सावंत, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्णा,  विठ्ठल पावडे, राजेश पावडे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह दहा जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत.

आ. हंबर्डे, आ.जवळगावकर,  माजी मंत्री सावंत, बेटमोगरेकर ही मुलाखतीच्या रांगेत

काँग्रेस पक्षाकडून आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या m या मुलाखती अत्यंत शिस्तबद्धपणे आणि लोकशाहीच्या मार्गाने घेण्यात आल्या. यापूर्वी ज्या मुलाखती होत होत्या त्या निकटवर्तीयांना रांगेतून सवलत देऊन घेतल्या जायच्या परंतु आज घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये अक्षरश: माजी मंत्री डीपी सावंत, आमदार मोहना हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनाही रांगेत उभे राहावे लागले. आपल्या नावाच उल्लेख होईपर्यंत वेटिंग रूममध्ये वाट पहावी लागली.

देगलूर मध्ये सर्वाधिक इच्छुक तर किनवट मध्ये सर्वात कमी 

देगलूर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच सर्वाधिक 29 इच्छुक उमेदवारांनी आपल्या मुलाखतीत दिले आहेत. आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेते सुरेश गायकवाड, माजी आमदार अविनाश घाटे, डॉक्टर दिनेश निखाते यांच्यासह अनेकांनी मुलाखती दिल्या तर सर्वात कमी इच्छुकांची संख्या किनवट विधानसभा मतदारसंघात दिसून आली. येथे केवळ सहा जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत.
Local ad 1