Maharashtra Vidhansabha Election 2024  । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजणार 

दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली । भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची (Vidhan Sabha Election)  आज घोषणा होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. त्यामुळे आजच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

 

Ratan Tata Death । रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड म्हणाली गुडबाय माझ्या जिवलग मित्रा…

 

भारत निवडणूक आयोगाकडून दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद  (Election Commission Of India Press Conference) आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची (Vidha Sabha Election 2024) मुदत 26 नोव्हेंबरला संपणार आहे. यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे, त्यानुसार आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा होणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात आचारसंहिता लागू होईल.

 

Maharashtra Vidhan sabha Election 2024

 

Local ad 1