मुंबई : केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्यावतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कार्यक्रमाच्या तिसर्या आवृत्तीमधे स्टार्टअप संस्थांसाठीच्या सहाय्य कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने ’टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकवला आहे. या क्रमवारीवर आधारित 2021 च्या आवृत्तीच्या निकालाची घोषणा आणि सत्कार समारंभ केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे झाला. (Maharashtra ‘Top Performer’ in Startup Rankings)
2021 च्या आवृत्तीमध्ये 7 व्यापक सुधारणा क्षेत्रांचा विचार करण्यात आला ज्यामधे 26 कृती मुद्दे होते जे स्टार्टअप्स आणि परिसंस्थेच्या भागधारकांना नियामक तसेच धोरण आणि आर्थिक समर्थन प्रदान करण्यासाठी आवश्यक आहेत. या सुधारणा क्षेत्रांमध्ये संस्थात्मक समर्थन, नाविन्यता आणि उद्योजकतेला चालना देणे, बाजारपेठेत प्रवेश, इनक्युबेशन समर्थन, निधी समर्थन, मार्गदर्शन आणि क्षमता निर्मिती यांचा समावेश होता.
महाराष्ट्र स्टार्टअप वीक, स्टार्टअप पोर्टल आणि महिला इनक्युबेशन सेंटर या प्रमुख उपक्रमांमुळे या क्रमवारीत महाराष्ट्राने ’टॉप परफॉर्मर’ क्रमांक पटकवला. 2018 च्या आवृत्तीत महाराष्ट्र हे उदयोन्मुख राज्य श्रेणीमध्ये होते तर 2019 च्या आवृत्तीत नेतृत्व श्रेणीमध्ये होते. (Maharashtra ‘Top Performer’ in Startup Rankings)