(lockdown unlock 2021) अखेर अनलाॅकची प्रक्रिया सोमवारपासून सुरु

मुंबई ः  कोरोना पॉझिटिव्हीटीच्या दरानुसार अनलाॅकचे टप्पे करण्यात आले आहेत. त्यात राज्यातील 18 जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. ( मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडीट्टीवार यांनी जाहीर केलेले) अनलाॅक (lockdown unlock 2021) प्रक्रियेची सुरुवात सोमवारपासून होणार आहे. याबाब राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मध्यरात्री आदेश जारी केला आहे. (Maharashtra to unlock in 5 levels, lockdown lifted in 18 districts)

राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. पहिल्या स्तरात 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरात 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्तरात 10 जिल्ह्यांचा तर चौथ्या स्तरांमध्ये फक्त दोन जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या पाचव्या स्तरात एकही जिल्हा नाही.   (lockdown unlock 2021)

पहिल्या टप्प्यात

औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्याचा समावेश असेल. या 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात आलेला आहे.

दुसरा टप्पा

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर आणि उपनगर, नंदुरबार, या जिल्ह्यांचा समावेश आहे. दुसऱ्या स्तरामध्ये मुंबईचा समावेश होतोय. त्यामुळे मुंबईसह इतर पाच जिल्ह्यात खालील नियम लागू राहतीलमुंबईसह या पाच जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता लोकल सेवा बंद राहील. (lockdown unlock 2021)

रेस्टॉरंट, मॉल्स आणि सिनेमगृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील, बांधकाम  क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील,   कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील,  ई-सेवा पूर्ण सुरू राहील, जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील,  बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जिल्हयाच्या बाहेर खासगी वाहन, बसेस, इतर राज्यात जाणारी लोकल सेवा, टॅक्सी यांना परवानगी आहे. मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता असेल.

तिसरा टप्पा  
तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, या जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील. सिनेमा चित्रीकरणाला स्टुडीओ मध्ये परवानगी असेल. सामाजित, सांस्कृती, मनोरंजनात्म कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील (सोमवार ते शुक्रवार) लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती, अंत्यसंस्कार 20 जणांची उपस्थिती, इतर बैठका 50 टक्के उपस्थित राहील. कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी राहील.  

चौथा टप्पा

पुणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये  अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद, सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील, हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील.  सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)  अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील  शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती  स्पोर्टसमध्ये आईटडोर सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही. (lockdown unlock 2021)

Local ad 1