Maharashtra Secondary Services Mains Exam 2021। महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर
Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 । महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे. (Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 General Merit, Provisional Selection List Released)
तात्पुरती निवड यादी व सर्व साधारण गुणवत्ता यादी या निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाच्या असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो. (Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 General Merit, Provisional Selection List Released)
खेळाडू प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडा विषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यांचा तात्पुरत्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी व निवड यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तात्पुरती निवड यादी न्यायालयात, न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आली आहे .
परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी १२.०० वाजेपासून ३० नोव्हेंबर, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. (Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 General Merit, Provisional Selection List Released)
ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब, निवेदने, पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाही. (Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 General Merit, Provisional Selection List Released)
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्प आधारे अंतिम निकाल, शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. (Maharashtra Secondary Services Mains Exam 2021 General Merit, Provisional Selection List Released)
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई- मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असेही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.