...

(Rojgar Melava)  पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा

पुणे ः पुणे जिल्ह्यातील तरुणांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आहे, हा  मेळावा दोन जून रोजी होणार असून, त्यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली. (Maharashtra Rojgar Melava Job Fair 2021)

कोरनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नोकरी करण्यास इच्छूक असूनही अनेक  तरुणांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे अशा  इच्छूकांसाठी  2 जून रोजी  ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी अनेक उद्योजक संस्थांनी रिक्त पदे भरायची आहेत असे कळवले आहेत. त्यामध्ये एम.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, चे विविध ट्रेड, बी.एस्सी, नर्सिग, जीएनएम, एएनएम, डी, फार्मसी, बी,  फार्मसी इत्यादी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी रोजगार मेळ्यात सहभागी होता येईल. (Maharashtra Rojgar Melava Job Fair 2021)


रोजगार मेळ्यात सहभागी होण्यासाठी http://rojgar.mahasayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा, एम्प्लाॅमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्डचा वापर करुन लाॅग इन करावे, तसेच ज्यांची  एम्प्लाॅमेंट नोंदणी नाही, त्यांनी नोंदणी करुन अर्ज करावा. याबाबत काही अडचण आल्यास 020 – 26133606 या क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन अनुपमा पवार यांनी केले आहे. (Maharashtra Rojgar Melava Job Fair 2021)

Local ad 1