...

Maharashtra Political Crisis LIVE Updates : आता शिवसेनेचा वाद जाणार न्यायालयात ? विधानसभा उपाध्याक्षांनी घेतला मोठा निर्णय

 

Maharashtra Political Crisis LIVE Updates : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेत मोठे वादळ आले  आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi government) अस्तित्व धोक्यात आले आहे.पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरु झाली. अशातच यामागे भाजपचा (BJP) हात असल्याचे आरोपही सत्ताधार्‍यांकडून केले जात आहेत.(Now Shiv Sena’s dispute will go to court? A big decision was taken by the Deputy Speaker of the Assembly)

 

 

बंड केल्यानंतर शिवसेनेने कारवाई करत एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेते पदावरुन उचलबांगडी केली. त्यांच्या जागी शिवसेना विधीमंडळ गटनेता (Shiv Sena Legislative Group Leader) पदावर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी (MLA Ajay Chaudhary) यांची नियुक्ती केली. त्यावर आक्षेप घेत एकनाथ शिंदेंच गटनेते असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता.  (Now Shiv Sena’s dispute will go to court? A big decision was taken by the Deputy Speaker of the Assembly)

 

त्यावर दावे-प्रतिदावे होत असतानाच आता शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभू यांना विधिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मान्यता दिल्याचे पत्र समोर आले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.  (Now Shiv Sena’s dispute will go to court? A big decision was taken by the Deputy Speaker of the Assembly)

Local ad 1