...

Maharashtra Political Crisis Live Updates : मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, मातोश्रीकडे निघाले

Maharashtra Political Crisis Live Updates मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसाठी असलेला वर्षा बंगला सोडला असून, ते मातोश्रीकडे निघाले आहेत.

 

‘वर्षा’वरून ‘मातोश्री’कडे जाताना उद्धव ठाकरे म्हणाले,  ज्यांना जायचं आहे त्यांनी जा…असं भावनिक वक्तव्य केले आहे.  उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे  शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप असल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Political Crisis Live Updates)

 

तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला. तुम्ही इकडे या, आणि मला सांगा, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लायक नाही, मी लगेच राजीनामा देतो असे म्हणाले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला आजच सोडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले. (Maharashtra Political Crisis Live Updates)

Local ad 1