HSC Exam Scam : बारावीचा निकाल पुढील महिन्यात लागणे अपेक्षित आहेत. मात्र, बारावीच्या परीक्षेच्या (HSC Exam) भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शिक्षण मंडळात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (Maharashtra News HSC Exam Scam Answer Sheet)
Zilla Parishad Bharti 2023। जिल्हा परिषद नोकर भरती अभ्यासक्रमात झाला बदल ; काय ते जाणून घ्या
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासत असताना या परीक्षेत भौतिकशास्त्र विषयाच्या सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याचेच हस्ताक्षर असल्याचे समोर आले. त्यामुळे याची माहिती शिक्षणमंडळाला देण्यात आली. त्यामुळे शिक्षण मंडळाने अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना नोटीसा पाठवत, चौकशीसाठी बोलावले आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी 9 मे पासून चौकशी केली जात आहे.
दरम्यान पहिल्यास दिवशी चौकशी समितीने 87 प्रकरणात विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतले आहेत. विशेष म्हणजे बीड आणि हिंगोली या दोनच जिल्ह्यांत हा सर्व प्रकार समोर आला आहे. तर चौकशीसाठी बोर्डात विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक ही उपस्थित होते. तर दुसरे हस्ताक्षर कोणाचे आहे आम्हाला माहित नाही. आमच्या उत्तरपत्रिकेत दुसऱ्याने कोणी व का लिहिले, याबाबत आम्हाला देखील आश्चर्य वाटत असल्याचे विध्यार्थी म्हणाले आहेत. (Maharashtra News HSC Exam Scam Answer Sheet)
निकालावर परिणाम होण्याची शक्यता
मंगळवारपासून शिक्षण मंडळाने संबंधित परीक्षार्थी विद्यार्थ्यांची चौकशी सुरू केली असून, त्यांना नोटीसा पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र उत्तरपत्रिकामध्ये असलेले दुसरे हस्ताक्षर आमचे नसल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता हे हस्ताक्षर कोणाचे असा प्रश्न शिक्षण मंडळाला पडला आहे. मात्र एकाच पेपरला एवढ्या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये बदल कसा झाला असाही प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांचे निकालावर (12th result 2023 hsc maharashtra board) परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.