आरोग्य विभागातील ड आणि क गटातील पदांसाठी या तारखांना होणार परिक्षा

Maharashtra health department recruitment 2021 आरोग्य विभागातील गट ड आणि क संवर्गासाठी 25 आणि 26 सप्टेंबरला परिक्षा होणार आहे.  आरोग्य विभागाने जारी केलेल्या सूचना सविस्तर वाचा…
परिक्षार्थी उमेदवारांसाठी सूचना:  department recruitment 2021
 • लेखी परिक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षा केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती प्रवेश पत्राद्वारे सर्व उमेदवारांना परिक्षेच्या दिनांकाच्या एक आठवडा आगोदर कळविण्यात येईल.
• या माहितीसाठी उमेदवारांनी नियमितीपणे पुढील संकेत स्थळांना भेट द्यावी  www.arogyabharti2021.in,http://arogya.maharashtra.gov.in

 http://nrhm.maharashtra.gov.in गट क संवर्गासाठी परिक्षेचे स्वरुप सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं१२१६/प्र.क्रं.(६५/१६)/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील. maharashtra health department recruitment 2021

ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.
२) गट क पदांकरिता १०० प्रश्न असलेली २०० गुणांची ओ.एम.आर. उत्तर पत्रिका पध्दतीने परिक्षा घेण्यात येईल.
३) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका एकूण १०० प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेतील प्रत्येक प्रश्नास ०२ गुण ठेवण्यात येतील.

४) लिपीक वर्गीय पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण १०० प्रश्नांकरीता २०० गुणांची परीक्षा राहील, निमवैद्यकिय, तांत्रिक संवर्गातील पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्नाकरिता १२० गुणांची व पदासंबंधित विषयाधारीत ४० प्रश्नांकरिता ८० गुण अशी एकूण २०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. वाहनचालक या पदाकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्नांकरिता १२० गुणांची व विषयाधारीत ४० प्रश्नांकरिता ८० गुण अशी एकूण २०० गुणांची व परीक्षा घेण्यात येईल व गुणवत्तेनुसार निवड करतेवेळी व्यावसायिक चाचणी ४० गुणांची घेण्यात येईल.

परीक्षा घेण्यात येईल व गुणवत्तेनुसार निवड करतेवेळी व्यावसायिक चाचणी ४० गुणांची घेण्यात येईल.

 (७) गट क संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील.
८) उपसंचालक, आरोग्य सेवा (परिवहन) पुणे यांच्या आस्थापनेवरील पदांकरिता व्यावसायिक चाचणी परिक्षा देखील घेण्यात येईल.
गट ड संवर्गासाठी परिक्षेचे स्वरुप सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं१२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील. १) सदर परीक्षेच्या प्रश्नपत्रीका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रीकेत एकूण ५० प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नास जास्तीत जास्त ०२ गुण ठेवण्यात येतील.
 एकूण १०० गुणांची परिक्षा असेल. गट ड संवर्गातील पदांकरिता परीक्षेचा कालावधी २.०० तासाचा राहील. २) याअन्वये गट क व गट ड संवर्गासाठीची लेखी परीक्षा दिनांक २५/०९/२०२१ व दिनांक २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येईल.
 • लेखी परिक्षेचे ठिकाण, वेळ, परीक्षा केंद्र, वेळापत्रक इत्यादी बाबतची सखोल माहिती प्रवेश पत्राद्वारे सर्व उमेदवारांना परिक्षेच्या दिनांकाच्या एक आठवडा आगोदर कळविण्यात येईल.
Local ad 1