(Class 10th) तुमची मुले यंदा दहावीला होती…तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा मंडळाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले नाहीत. मात्र सुधारित मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थीनिहाय गुणदान केले जाणार आहे. (Maharashtra Board class 10th exams 2021)

विद्यार्थ्यांचे नाव, बैठक क्रमांक व अनुषंगिक तपशील माध्यमिक शाळांना उपलब्ध करुन दिलेला आहे. या तपशीलामधील विषय / माध्यम, फोटो, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख, जन्मस्थान, इतर तत्सम दुरुस्त्या असल्यास याबाबत संबंधित शाळांनी प्रचलित पद्धतीप्रमाणे संबंधित विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व सर्व माध्यमिक शाळा यांनी आपल्या स्तरावर सुचित करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Board class 10th exams 2021)


राज्यातील सर्व विभागीय मंडळांनी यासंदर्भातील दुरुस्त्या विभागीय मंडळातील / निर्धारित गणकयंत्र विभागामार्फत करुन राज्य मंडळाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्य मंडळाच्या गणकयंत्र विभागाकडे पाठवाव्यात. या दुरुस्तीबाबत सर्व माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, विद्यार्थी, शिक्षक, पालक व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. (Maharashtra Board class 10th exams 2021)

Local ad 1