दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार ; आली महत्वाची अपडेट

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातच सीबीएसईचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचा निकाल कधी लगणार याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Board 10th 12th Result 2023)

 

 

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या निकाल कधी लागणार आहे. यासंदर्भात अधिकार्‍यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार राज्य मंडळाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लवकरच लागणार आहेत. यासाठी आवश्यक तयारी सध्या सुरू आहे.
महाराष्ट्र बोर्डाचे दहावी आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी https://www.mahahsscboard.in/,mahresult.nic.inhscresult.mkcl.org आणि mahresults.org.in या संकेतस्थळावर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकणार आहेत. (Maharashtra Board 10th 12th Result 2023)

 

राज्य मंडळाकडून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन्ही निकाल म्हणजे इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे, असे सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आली. तसेच दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. (Maharashtra Board 10th 12th Result 2023)
Local ad 1