महाराष्ट्रात एकाच टप्प्यात होणार विधानसभेसाठी मतदान ; मतदान आणि मतमोजणी कधी होणार ? 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. त्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. (Maharashtra Assembly Elections Announced) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी राज्यात मतमोजणी होईल. म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. उमेदवारांना 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर अर्जांची छाननी 30 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. (vidhan sabha election date 2024)

 

 

Maharashtra Assembly Elections Announced

 

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर, 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकांचा निकाल लागणार आहे. राज्यातील 288 मतदारसंघात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून याच महिन्यात 29 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे. म्हणजे, 15 दिवसांतच उमेदवारांना अर्ज भरण्याची तयारी करावी लागणार आहे. त्यातच, काही दिवसांपूर्वी नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकीचीही घोषण करण्यात आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांप्रमाणेच लोकसभा पोटनिवडणुकांचेही वेळापत्रक असणार आहे. त्यानुसार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान व 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होईल. (Maharashtra Assembly Elections Announced)

 

विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक

निवडणुकीचे नोटिफिकेशन – 22 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
मतमोजणी – 23 नोव्हेंबर
निवडणूक प्रक्रिया समाप्त – 25 नोव्हेंबर  2024

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक

अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर

अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर

मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर

मतमोजणी – 23 नोव्हेंबर

Local ad 1