Mahapareshan Bharti 2023 । महापारेषण मध्ये मेगा भरती ; किती जागा आहेत जाणून घ्या !

Mahapareshan Bharti 2023 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (Azadi Ka Amrit Mahotsav) राज्यात 75 हजार पदे शासकीय नोकरी भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने विविध शासकीय विभागामध्ये भरती प्रक्रिया राबवलि जात आहे. त्यात आता महापारेषणमध्येही पदभरती होणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक  झाली. त्यात यावर विचारमंथन करण्यात आले.  (Mahapareshan Bharti 2023 ; Find out how many seats there are ! )

 

 

महापारेषण (Mahapareshan) या शासकीय वीज कंपनीत रिक्त असलेली सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) १ हजार ८६८ पदे आणि इतरही पदे भरली जाणार आहेत. यासंदर्भात  मुंबईच्या प्रकाशगंगा येथे संचालक (मासं) सुगत गमरे  (Director Sugat Gamre) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची सोमवारी ( २६ जून) बैठक झाली. याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक (मासं) सुधीर वानखेडे,  महाव्यवस्थापक (मासं) राजू गायकवाड  व  मुख्यऔद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील (Chief General Manager Sudhir Wankhede, General Manager Raju Gaikwad and Chief Industrial Relations Officer Bharat Patil) उपस्थित होते. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेच्या वतीने सरचिटणीस कृष्णा भोयर व उपाध्यक्ष भिमाशंकर पोहेकर उपस्थित होते.

 

कंपनीमध्ये सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) १८६८ पदे भरण्याची (Assistant Technician (General) 1868 Posts to be filled) प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. तंत्रज्ञ- १, २ व सिनिअर टेक्नीशियन सरळसेवा भरती करीता राखीव असलेली ६३२ पदेही भरण्याबाबत प्रक्रिया होईल. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) ही पदे भरताना महावितरण प्रमाणे विद्युत व इतर सहाय्यक पदे जशी भरली त्याप्रमाणे ३ वर्षे कंत्राटी पद्धतीने मानधनावर भरण्याबाबतचे प्रयत्न आहे.

Local ad 1