MahaDBT portal। विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

MahaDBT portal । MH  टाईम्स वृत्तसेवा : केंद्र सरकारची शिष्यवृत्ती परीक्षा (Central Government Scholarship Examination), शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क आणि राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना 31 जानेवारी (January 31, 2022) पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने महाडिबीटी पोर्टलवर (On the MahaDBT portal) शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करावे लागणार आहे. (Good news for students … extension of time to apply for scholarship)

 

Railway started । जालना ते पुणे व किसान रेल्वे सुरु

 

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-2021 या वर्षासाठी पुन्हा अर्ज व 2021-2022 या वर्षाकरिता नवीन अर्ज सादर करण्यासाठी 14 डिसेंबर 2021 पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. याअनुषंगाने सर्व शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयामधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,  इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरून वेळेत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Good news for students … extension of time to apply for scholarship)

 

Omicron update। पुणे शहर आणि जिल्ह्यात ओमायक्रॉन बाधित 46 रूग्ण आढळल्याने खळबळ

 

विद्यार्थ्यांनी महाडिबीटी संकेतस्थळावर (MahaDBT portal) यापूर्वी आधार संलग्नित युजर आयडी तयार करून अर्ज भरलेला असेल, त्यांनी नवीन नॉन आधार यूजर आयडी तयार करू नये. तसेच नवीन नॉन आधार युजर आयडीवरून अर्ज नूतनीकरण केल्यास व एका पेक्षा जास्त यूजर आयडी तयार केल्यास सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल, असेही कळविण्यात आले आहे. (Good news for students … extension of time to apply for scholarship)

अंकिता पाटील-ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

 

नव्याने अर्ज असा करा..

MahaDBT पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन आयडी, पासवर्ड तयार करा. पोर्टलवर लॉग इन व्हा. तुमचे प्रोफाइल तयार करा. ज्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहात त्यासाठी अर्ज करा.

 

Local ad 1