...

महाविकास आघाडीने हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम उमेदवार द्यावा, मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाचे शरद पवारांना साकडे

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये  हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचा प्रतिनिधित्व करणारे  ॲड अय्युब शेख (Adv Ayyub Sheikh) यांना उमेदवारी देऊन मुस्लिमांना सत्तेत भागीदारी द्यावी. चाळीस वर्षांपूर्वी फक्त एकच मुस्लिम आमदार पुण्यातून अमिनुद्दिन पेनवाले निवडून गेले होते.  त्यानंतर कधीही मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व करण्याची पुण्यात संधी मिळालेली नाही. महाविकास आघाडी कडून यावेळी उमेदवारी द्यावी, अशी मागणी  पुणे शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवार यांची भेट घेऊन केली आहे. यामध्ये सकारात्मक विचार केला जाईल, असे अश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली आहे. (Maha Vikas Aghadi should feed a Muslim candidate in Hadapsar Assembly Constituency, the delegation of Muslim community to Sharad Pawar)

 

या शिष्टमंडळात मौलाना निजामुद्दीन फखरुद्दीन (Maulana Nizamuddin Fakhruddin)  मौलाना कारी इद्रिस अन्सारी, दी मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन अलीरजा इनामदार (Alireza Inamdar, Vice Chairman, The Muslim Co-operative Bank) सामाजिक कार्यकर्ता अंजुम इनामदार, मुस्लिम बँक संचालक सईद सय्यद, बबलू सय्यद, सादिक लुकडे, हाजी गुलाम अहमद एज्युकेशन ट्रस्टचे मशकूर शेख, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे इकबाल अन्सारी, सोहेल खान, रफिक शेख, काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक सेल नदीम मुजावर, मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स गफ्फर सागर, लतीफ शेख, प्रकाश मस्के, माजी नगरसेविका फरजाना शेख, जय हिंद महिला उद्योगच्या अनिसा खान, इब्राहिम यवतमाळ वाला, रिटायर एसीपी जान मोहम्मद पठाण, रिटायर पीएसआय जमील शेख, युवा कार्यकर्ता आरिफ शेख इत्यादी मान्यवर शिष्टमंडळात उपस्थित होते.

शिष्टमंडळाशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, गेल्या दहा वर्षाचा इतिहासामध्ये केंद्र सरकारला फक्त हिंदू -मुस्लीम धर्मामध्ये ध्रुवीकरण कसे करता येईल, हेच धोरण आनत असलल्याचे दिसून येत असल्याचे म्हणाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धर्मांध शक्तीला रोखण्यासाठी 400 प्लसचा आकडा पार करण्याचे स्वप्न पहाणारे आणि  देशाची  राज्यघटना बदलण्याचा विचार बाळगणाऱ्यांना जागरिक मतदारांनी ताकतीने रोखण्याचे काम केले आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर असे दिसून आले की पहाटे सकाळी लवकर मुस्लिम बांधव आणि महिलांनी मतदानासाठी मोठी रांग लावली होती. जितका गांभीर्याने मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत पुढे येऊन मतदान केले तसेच यंदाही विधानसभा निवडणुकीत ही पुढे येऊन धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.

 

 

मुस्लिम समाज काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत अनेक वर्षापासून आहे, परंतु उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सर्व उमेदवारांना व शिवसैनिकांना मुस्लिम समाजाने स्वीकारून मोलाचे सहकार्य केले आहे. काही दिवसातच विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार असून, लवकरच त्याबाबत आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसून योग्य ते निर्णय घेऊ.  पक्षाची भूमिका असेल की यावेळी जास्तीत जास्त आमदार मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी करणारे विधिमंडळात गेले पाहिजे, याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन पवार यांनी दिले आहेत.

 

Local ad 1