...

खळबळजनक : माॅब लिंचींगने अहमदनगर जिल्हा हदरला, पोलिस अधिकाऱ्यासह चौघांना मारहाण

अहमदनगर : जिल्ह्यातील अरणगाव (ता.जामखेड) येथे 70 ते 80 जणांच्या संतप्त जमावाकडून पोलिस अधिकाऱ्यासह चौघांना मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. (In Arangaon (Jamkhed taluka) of the district, an angry mob of 70 to 80 people beat up a police officer and three others.) त्यामुळे एकच खळबळ उढाली असून, या प्रकरणी 30 पेक्षा अधिक संशयितांविरोधात खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Mab linching shook Ahmednagar district, beating four including a police officer)

 

जामखेड पोलिसांनी (Jamkhed Police) दिलेल्या माहितानुसार, 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव येथे सुमारे 70 ते 80 जणांच्या जमावाने एका इंडिगो कारने प्रवास करणाऱ्या आष्टी तालुक्यातील चौघांना संशयावरून आडवले. लाठ्या- काठ्या, लोखंडी रॉड तसेच दगडाने जबर मारहाण केली. तसेच त्यातील एका व्यक्तीच्या खिशातील 50 हजार रुपये जबरीने हिसकावून घेतले तसेच कार फोडली. विषेश म्हणजे चौघापैकी एकजण सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये (jamkhed police station) जिवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमविणे आदी कलमातंर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Mab linching shook Ahmednagar district, beating four including a police officer)

 

आष्टी (बीड) येथील कोंबडी व्यावसायिक विशाल भानुदास कांबळे व त्यांचे भाऊ किरण भानुदास कांबळे (सहायक पोलीस निरीक्षक), सासरे संजय विठ्ठल निकाळजे, व सुनिल कचरू निकाळजे यां चौघांना चोर समजुन वंजारवाडीच्या संतप्त टोळक्याने अमानुष मारहाण केली आहे. घटनास्थळी अरणगाव येथील प्रवीण निगुडे, रणजित कारंडे, प्रशांत जगताप, सरपंच अंकुश शिंदे, गफ्फार भाई पठाण, पाटोदा गरडचे सरपंच यांनी धाव घेऊन चौघांची जमावापासून सुटका केली. (Mab lynching shook Ahmednagar district, beating four including a police officer)

 

माॅबलिंचिंग प्रकरणी वंजारवाडी येथील बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉ. सुरज रामकिसन जायभाय, राजु तुकाराम जायभाय, तुकाराम जायभाय, रामकिसन संभा जायभाय, मधुकर दत्तु जायभाय, शिवाजी जायभाय, बबन भगवान खाडे, सतिश ( पुर्ण नाव माहित नाही.) या नऊ जणांसह अन्य वीस ते 25 अश्या तीस पेक्षा अधिक लोकांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Mab lynching shook Ahmednagar district, beating four including a police officer)

Local ad 1