LPG Price Hike। घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांत पुन्हा वाढ
नवी दिल्ली : देशभरात महागाईने (Inflation) सर्वसामान्य माणूस बेजार झाले आहेत. आज पुन्हा एकदा घरगुती एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांत वाढ (LPG Price Hike) झाली आहे. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती एक हजार पार पोहोचल्या आहेत. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas Cylinder Rate) 8 रुपयांनी महागला आहे. (Rise in domestic LPG cylinder rates)