अबब..! अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात सुमारे चार हजार कोटींचे नुकसान !

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पुरता पाण्यात गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार  मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर क्षात्रापैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. (Out of 48 lakh hectare area, crop loss on 35 to 36 lakh hectare area) एनडीआरएफच्या निकषानुसार (According to the criteria of NDRF) सुमारे 4 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. (Loss of Rs 4,000 crore in Marathwada due to heavy rains)

 

अजित पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी तसेच झालेल्या नुकसानीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वेळ आली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले. मराठवाड्यातील पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. वेळप्रसंगी कर्ज काढू. पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. (Loss of Rs 4,000 crore in Marathwada due to heavy rains)

 

एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु असून, मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत. तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, असेदेखील अजित पवार म्हणाले. (Loss of Rs 4,000 crore in Marathwada due to heavy rains) 

रस्ते पूल सगळे वाहून गेले. तलाव फुटले आहेत. नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही. मात्र, यंत्रणा काम करत आहे. यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत. आता केंद्रानेही पैसे द्यावेत. नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत. यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. (Loss of Rs 4,000 crore in Marathwada due to heavy rains)

 

 

Local ad 1