नांदेड जिल्ह्यातील साडे आठ लाख शेतकऱ्यांचे नुकसान ; मदतीसाठी हवेत 420 कोटी
नांदेड : जिल्ह्या त जुलै, ऑगष्ट व सप्टेंबर मध्ये (July, August and September) झालेल्या अतिवृष्टीमुळे सहा लाख सहा हजार ३२८ हेक्टरमधील (Six lakh six thousand 328 hectares) जिरायती, बागायतीसह फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हवी तात्काळ आर्थिक मदतीची गरज आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी शनिवारी औरंगाबाद येथे आढावा बैठक घेतली. त्यात नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी 419 कोटी 42 लाख रुपयांची गरज आहे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. (Loss of eight and a half lakh farmers in Nanded district)
जुलै, ऑगष्ट व सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होऊन पुराच्या पाण्यात पिके बुडाली. कृषी, महसुल व जिल्हा परिषद यंत्रणेकडून पंचनामे करण्यात आले. जुलैमध्ये ७१ हजार २२१ हेक्टरचे नुकसान झाले होते. यासाठी ३० कोटी ३५ लाख ४६ हजार रुपयाची मदत मंजुरी मिळाली आहे. तर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सात लाख ९० हजार ५३५ शेतकऱ्यांचे एकूण पाच लाख ६१ हजार ७१९ हेक्टरचे नुकसान झाले. यासाठी ३८९ कोटी सहा लाख रुपयांची मागणी केली आहे. (Loss of eight and a half lakh farmers in Nanded district)