(lockdown) “त्या” 18 जिल्ह्यातील लाॅकडाऊन शिथिल नाही ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई : राज्यातील निर्बंध उठविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन  पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत.  व्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन  असून, नांदेडसह 18 जिल्ह्यातील लाॅकडाऊन हटविण्यात आलेले नाही, असे स्पष्टी़करण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत. (lockdown in the state is still going on, the proposal- cmo

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे रोखलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. (lockdown in the state is still going on, the proposal- cmo


 

टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून, जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून  याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार याची संपूर्ण माहिती शासन निर्णयाद्वारे दिली जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले. (lockdown in the state is still going on, the proposal- cmo)

Local ad 1