पुणे | नववर्षाच्या स्वागताच्या (Happy New Year) पार्टीमध्ये दारुचा वापर मोठ्या प्रणाणात होत असतो. ही संधीचा फायदा घेण्यासाठी मद्य तस्कर सक्रिय होतात. गोवा राज्यात निर्मित मद्य कमी किंमतीत आणून ते महाष्ट्रातील किंमतीत बेकायदा विक्री केली जाते. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातो. अशा प्रकारे बेकायदा मद्य विक्री आणि वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे (Liquor worth 1 crore 20 lakhs seized by the State Excise Department)
गोवा बनावटीचे मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ९ आरोपींना अटक करुन विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या व ५ वाहने जप्त केली आहेत. पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर (Pune Division Divisional Deputy Commissioner Sagar Dhomkar), पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत(Pune State Excise Department Superintendent Charan Singh Rajput), उपअधीक्षक संतोष जगदाळे (Deputy Superintendent Santosh Jagdale) यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई सासवड विभागाने केली आहे. (Liquor worth 1 crore 20 lakhs seized by the State Excise Department)
SET Exam Date 25 Maharashtra । राज्य पात्रता परीक्षेची (सेट) तारीख जाहीर
गोवा बनावटीचे मद्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तब्बल १ कोटी २० लाख ३२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ९ आरोपींना अटक करुन विदेशी मद्याच्या १६६८ बाटल्या व ५ वाहने जप्त केली आहेत. संशयित वाहनांची तपासणी करत असताना गोवा बनावटी मद्याचे ३ बॉक्स राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाले. त्याच्याकडे चौकशीतून नसरापूर येथील एका पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला असता तेथे एक जण अशोक लेलँड ट्रक मधून गोवा बनावटी मद्याचे बॉक्स गाडीतून उतरून गोडाऊन मध्ये ठेवला होता. त्याला ताब्यात घेऊन शेडची तपासणी केली असता ट्रकमध्ये वीटभट्टीसाठी लागणार्या कोळशाची पावडर व गोवा बनावटीचे विविध ब्रांडच्या विदेशी मद्याचे बॉक्स तसेच पत्रा शेड मध्ये थर्माकोलच्या बॉक्समध्ये गोवा बनावटी मद्य मिळून आले. हे मद्य थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅकिंग करुन फ्रुट पल्पच्या नावाखाली गुजरात व इतरत्र पाठविण्यासाठी पॅकिंग केलेल्या जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून अशोक लेलंड सहा चाकी ट्रक, गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १७१० बाटल्या व इतर एका एकूण५१ लाख ९५ हजार १७० रुपयांचा माल जप्त करुन चौघांना अटक केली आहे.
या कारवाईत निरीक्षक एस एस बरगे, दुय्यम निरीक्षक पी एम मोहिते, एस सी शिंदे, तसेच संदीप मांडवेकर, जवान सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे, ऋतिक कोळपे, बाळू आढाव यांनी भाग घेतला.
दरम्यान, दुसरी कारवाई निगडी येथील पवळे पुलाखाली भक्ती शक्ती चौक येथे करण्यात आली. गोवा राज्यात विक्रीकरता असलेले विदेशी मद्य व बिअर असा एकूण १ लाख ३४ हजार २३० रुपयांचा मद्यसाठी एका लक्ष्मी क्वीन ट्रव्हल कंपनीच्या खासगी बसमधून आणला जात होता. बसचालकाला ताब्यात घेऊन हा साठा जप्त करण्यात आला. (Liquor worth 1 crore 20 lakhs seized by the State Excise Department)