(Liquor sales) दारु विक्रीची माहिती देणाऱ्याला  मिळणार ‘खास’  भेट 

लातूर : दारुमुळे अनेक संसार देशोधडीला लागले असून, त्यामुळे गावात दारुचा थेंब यायला नको, असे अनेकांना वाटत. गावात दारुविक्रीला बंद घातली तरी दारुची तलफ भागविण्यासाठी अनेक फॅर्म्युले वापरतात. मात्र, ते ही प्रयत्न हणुन पाडण्यासाठी लातूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतींने बेकायदा दारु विक्रीची माहिती देणाऱ्याला खास भेट दिली जाईल, असा ठरावच पारीत केला आहे. (Liquor sales)

गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याचे काम सध्या सुरु आहे. अशीच एक योजना औसा तालुक्यातील  टाका गावातील अवैध दारूविक्रीला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने एक आगळा वेगळा ठराव संमत केला आहे.

अवैध दारूविक्री निर्देशनास आणून देणाऱ्यास एक वर्षाचा ग्रा.पं. चा कर माफ, तर अवैध दारूविक्रेत्यास व ज्या हॉटेल मध्ये दारु पिलेले आढळून येईल त्या हॉटेल चालकाकडून पाच हजाराचा दंड वसूल केला जाणार आहे. (Liquor sales)

गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरु असून यामुळे गावातील सामाजिक व धार्मिक सलोखा बिघडत असल्याचे सांगितले जात आहे या दारुचा महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे ग्रामपंचायतीला निदर्शनास आणून दिल्या गेले. यावर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी याबाबत चर्चा करून दारुबंदीचा एकमुखी ठराव संमत केला. यानुसार गावात कोणी अवैध दारूविक्री करीत असेल तर दारु विक्रेता ग्रामपंचायतीला निदर्शनास आणून देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचा एक वर्षाचा ग्रा.पं. कर माफ केला जाणार आहे.  (Liquor sales)

Liquor sales
Liquor sales
Local ad 1