(liquor) हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहिम ; १४ ठिकाणी छापेमारी
पुणे : लॉकडाऊनचा फायदा घेत ग्रामीण भागात हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांनी डोकेवर काढले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संयुक्त मोहिम राबवली. त्यात १४ ठिकाणी छापेमारी करत चार आरोपिंना अटक केली. तर एकूण नऊ लखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (liquor)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३१मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यात सर्व प्रकारची मद्यविक्रीही बंद ठेवण्यात आली. या संधीचा लाभ घेत ग्रामीण भागात जंगलामध्ये हातभट्टी दारु बनवणाऱ्या भट्ट्या सुरु करण्यात आल्या. या हलचालीवर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संयुक्त मोहिम राबवली. त्यात एकाचवेळी 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. सात हातभट्यांमध्ये दारु तयार करणारे अधिकारी पोहोचण्यापूर्वीच पसार झाले. तर सात ठिकाणी हातभट्टी चालकांची माहिती मिळाली. चार आरोपिंना अटक केली असून, तीन आरोपिंचा शोध घेतला जात आहे. (liquor)
हातभट्टी दारु तयार करण्यासाठी आवश्यक असलेले 30 हजार 800 लीटर रसायन, 945 लिटर हातभट्टी दारू, 85 लिटर ताडी, तीन वहानेजप्त करण्यात आली. त्याची किंमत 2 लाख 15 हजार आहे. तर एकूण मुद्दे मालाची किमंत 9लाख 17 हजार रुपये आहे. (liquor)
इंद्रयणी नदीकाठी, चिंबळी फाटा, शिंदवणे, नांदूर, खामगाव, बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर व इतर ठिकाणी करण्यात आली. ही कारावाई उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक संजय जाधव, एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक अनिल बिराजदार, अर्जून पवार, राजाराम खोत, सुरज दाबेराव, दुय्यन निरीक्षक स्वाती भरणे, अनिल सुतार यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते. (liquor)